दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसरा सामना, दिल्ली विरुद्ध पंजाब हा चांगलाच अटीतटीचा आणि थरारक ठरला. दिल्लीच्या संघाने या सामन्यात सुपर ओवरमध्ये बाजी मारली. मात्र अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील सदोष पंचगिरीसंदर्भात दिग्गजांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पंजाब संघाचा मार्गदर्शक असणाऱ्या विरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण तसेच पंजाब किंग्स इलेव्हनची मालकीण बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
-
I don’t agree with the man of the match choice . The umpire who gave this short run should have been man of the match.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Short Run nahin tha. And that was the difference. #DCvKXIP pic.twitter.com/7u7KKJXCLb
">I don’t agree with the man of the match choice . The umpire who gave this short run should have been man of the match.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 20, 2020
Short Run nahin tha. And that was the difference. #DCvKXIP pic.twitter.com/7u7KKJXCLbI don’t agree with the man of the match choice . The umpire who gave this short run should have been man of the match.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 20, 2020
Short Run nahin tha. And that was the difference. #DCvKXIP pic.twitter.com/7u7KKJXCLb
दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामन्यात, दिल्लीचा खेळाडू मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा, असा उपरोधक टोला लगावला आहे. त्याने ट्विटवरुन हा टोला लगावला आहे.
मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली, त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता आणि याच एका रनचा फरक नंतर पडला, अशा आशयाचे ट्विट सेहवागने केले आहे.
काय आहे प्रकरण -
पंजाबचा संघ धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकात ख्रिस जॉर्डनने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असे जाहीर केले. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते.
हेही वाचा - IPL २०२० : आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना
हेही वाचा - IPL २०२० : चेन्नईला जबर धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पुढील काही सामन्याला मुकणार