ETV Bharat / sports

IPL 2020 : आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधीच हैदराबादला जबर झटका, 'हा' अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर

रॉयल चॅलेजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. त्याचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धतून बाहेर पडला आहे.

IPL 2020 Vijay Shankar ruled out of tournament due to hamstring injury
बंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधीच हैदराबादला जबर झटका, 'हा' अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
author img

By

Published : Oct 31, 2020, 3:18 PM IST

दुबई - रॉयल चॅलेजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याआधी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. त्याचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धतून बाहेर पडला आहे. आज हैदराबादचा महत्वपूर्ण सामना असून प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी या त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. अशा विजय शंकर संघाबाहेर गेल्याने, हैदराबादला मोठा झटका बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरला दुखापत झाली होती. गोलंदाजीदरम्यान, त्यांच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. यानंतर त्याने, १.५ षटकच गोलंदाजी केली. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक चेंडू टाकत त्याचे षटक पूर्ण केले.

दरम्यान, दिल्लीविरुध्दच्या याच सामन्यात हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला देखील दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या जागेवर श्रीवस्त गोस्वामी याने यष्टीरक्षण केले. पण वॉर्नरने सामना संपल्यानंतर साहाची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले.

विजय शंकरच्या आधी हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला आणि तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. आता विजय शंकरच्या दुखापतीमुळे हैदराबादची डोकेदुखी वाढली आहे. शंकरने या आयपीएल हंगामात ७ सामने खेळली आहेत. त्याने फलंदाजीत ९७ धावा केल्या आहेत. यात राजस्थानविरुद्धच्या अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने ४ गडी बाद केले आहेत.

हेही वाचा - IPL २०२० : बंगळुरू-हैदराबाद यांच्यात सामना, सनरायझर्सला विजय अनिर्वाय

हेही वाचा - DC VS MI : मुंबईचं बलाढ्य आव्हान पेलत प्ले ऑफ फेरी गाठण्याचे दिल्लीचं लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.