अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात बुधवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामना पार पडला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई हा सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने स्लेजिंग केले. तो सूर्यकुमार यादवच्या दिशेने आला आणि त्याला खुन्नस देत त्याला उकसवण्याचा प्रयत्न केला. पण यावर सूर्यकुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, उलट तो तिकडून शांतपणे निघून गेला.
सूर्यकुमारने मैदानात अखेरपर्यंत तळ ठोकत मुंबईला सामना जिंकून दिला. विजयानंतरही सूर्यकुमारने उत्साहात कोणताही इशारा केला नाही. तसेच त्याने या सामन्यात विराटने केलेल्या कृतीला देखील कोणतेही प्रत्युत्तर न देता त्याने प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मन जिंकले.
काय घडले -
या सामन्यात डेल स्टेनने टाकलेल्या १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर विराटने फिल्डिंग केली. ते षटक संपल्यानंतर विराट चालत सूर्यकुमारकडे आला आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत उभा राहिला. सूर्यकुमार यादव यानेदेखील त्याच्या नजरेत नजर घालून पहिले आणि तिथून निघून गेला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर हे व्हायरल झाले आणि विराटवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
-
Here's the full video... SKY 🙌 pic.twitter.com/QnyF2LYRag
— GYPSY🕊️ (@sfcunity) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here's the full video... SKY 🙌 pic.twitter.com/QnyF2LYRag
— GYPSY🕊️ (@sfcunity) October 28, 2020Here's the full video... SKY 🙌 pic.twitter.com/QnyF2LYRag
— GYPSY🕊️ (@sfcunity) October 28, 2020
दुसरीकडे आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये सूर्यकुमार यादवची निवड निश्चित मानली जात होती, पण त्याला संधी न दिल्यामुळे निवड समिती आणि विराट कोहलीवर टीका होत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
आयपीएलमध्ये सूर्यकुमारची कामगिरी -
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सूर्यकुमार यादवने तडाकेबंद कामगिरी केली आहे. त्याने १२ सामन्यांत १४४च्या स्ट्राईक रेटने ३६२ रन केल्या आहेत.
हेही वाचा - MI vs RCB : मुंबईचा विराटसेनेवर पाच गडी राखून विजय...प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित