अबुधाबी - राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा ऑर्चर त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि बाऊंसरचा मारा करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तो विरोधी संघाच्या गोटात खळबळ माजवत आहे. इतकेच नव्हे तर, तो क्षेत्ररक्षणात देखील आपले मोलाचे योगदान देत आहे. रविवारी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात जोफ्राने एक भन्नाट झेल टिपला. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर असून, जोफ्राच्या क्षेत्ररक्षणावर भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलरकरने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं -
अबुधाबीमध्ये राजस्थान आणि मुंबई यांच्यात सामना झाला. मुंबईच्या प्रथम फलंदाजीदरम्यान, इशान किशन मैदानात होता. त्याने कार्तिक त्यागीने टाकलेल्या ११ व्या षटकात एक चेंडू टोलावला. हा चेंडू सीमारेषेवर उभा असलेल्या जोफ्राने उडी घेत एका हाताने झेलला. जोफ्राने पकडलेला झेल पाहून मैदानात असणाऱ्या रियान पराग, गोलंदाज कार्तिक त्यागी अचंबित झाले. इतकेच नव्हे तर, समालोचकांनी देखील जोफ्राने पकडलेल्या झेलचे तोंडभरून कौतूक केले.
-
Breathtaking from Jofra Archer.!!! pic.twitter.com/3F9pG6059O
— David Purvis (@dp_ni) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Breathtaking from Jofra Archer.!!! pic.twitter.com/3F9pG6059O
— David Purvis (@dp_ni) October 25, 2020Breathtaking from Jofra Archer.!!! pic.twitter.com/3F9pG6059O
— David Purvis (@dp_ni) October 25, 2020
काय म्हणाला सचिन -
सचिनने जोफ्राने पकडलेल्या झेलवर मजेशीर प्रतिक्रिया दिली. त्याने या संदर्भात एक ट्विट केले. जोफ्राने पकडलेल्या झेल पाहून मला वाटलं की, तो त्याच्या घरातील बल्ब बदलत आहे, असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
Woh catch dekh kar aisa laga ki @JofraArcher apne ghar ka bulb 💡 badal raha hai. 🤯#RRvMI
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Woh catch dekh kar aisa laga ki @JofraArcher apne ghar ka bulb 💡 badal raha hai. 🤯#RRvMI
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 25, 2020Woh catch dekh kar aisa laga ki @JofraArcher apne ghar ka bulb 💡 badal raha hai. 🤯#RRvMI
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 25, 2020
बेन स्टोक्सच्या ६० चेंडूत नाबाद १०७ धावा आणि त्याने संजू सॅमसनसोबत केलेल्या तिसऱ्या गड्यासाठी १५२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने बलाढ्य मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ मुंबईसमोर गुडघे टेकेल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले.
हेही वाचा - MI vs RR : शतकानंतर बेन स्टोक्सचे मधलं बोट दाखवत सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण...
हेही वाचा - 'हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे', चेन्नईने बिघडवू शकते प्ले ऑफचे गणित