ETV Bharat / sports

RR vs KXIP : 224 धावांचे लक्ष्य पूर्ण करत राजस्थानचा पंजाबवर दमदार विजय; सॅमसन, राहुल तेवतिया विजयाचे शिल्पकार - पंजाब स्कॉड टुडे

राजस्थानने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला होता. तर, पंजाबने मागील सामन्यात बंगळुरुविरुद्ध विजय मिळवला आहे.

RR vs KXIP
राजस्थानचा पंजाबवर ४ गडी राखून विजय
author img

By

Published : Sep 27, 2020, 7:01 PM IST

Updated : Sep 28, 2020, 1:13 AM IST

शारजाह - राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा चार गडी राखून पराभव केला. संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया हे राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला २२४ धावांचे मोसमातील सर्वात मोठ्या धावसंख्येचे आव्हान दिले होते. याबदल्यात राजस्थाने १९ षटक आणि ३ चेंडूत ही धावंसख्या पूर्ण करत विजय नोंदवला. राजस्थानच्या संजू सॅमसनने ४२ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांसह ५३ धावा केल्या. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथ यानेही वेगवान अर्धशतक झळकावले.

त्याने २७ चेंडूत २ षटकार आणि २७ चेंडूंसह ५० धावा केल्या. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनेही पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. तर रॉबिन उथप्पा याने ९ तर बटलर आणि टॉम करन यांनी प्रत्येकी ४ धावा केल्या.

पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने ४ षटकांत ५३ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. तर शेल्डन कोट्रेल, नीशम, मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपला तिसरा सामना खेळण्यासाठी रविवारी मैदानात उतरला होता. त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने राजस्थानसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाबचा सलामीवीर फलंदाज मयांकने आक्रमक फलंदाजी करत ४५ चेंडूत शतक साकारले.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्या १८३ धावांच्या जबरदस्त सलामी भागीदारीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात २ बाद २२३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय अंगउलट आल्याचे चित्र तयार झाले होते. मयांक-राहुल जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांची पिसे काढत मोठी धावसंख्या उभारली. मयांकने ४५ चेंडूत आपले शतक साकारले तर, राहुलने त्याला चांगली साथ दिली. मयांक ५० चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. टॉम करनने त्याला माघारी धाडले. मयांकच्या खेळीत १० चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा ठोकल्या. त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. राहुलला अंकित राजपूतने बाद केले.

मयांक-राहुल बाद झाल्यानंतर मॅक्सवेल आणि निकोलस पूरने संघाची धावसंख्या दोनशेपार नेली. जोफ्रा आर्चरच्या आणि संघाच्या शेवटच्या षटकात निकोलस पूरन आणि मॅक्सवेलने १८ धावा कुटल्या. राजस्थानने अतिरिक्त १० धावा दिल्या. पूरनने ८ चेंडूत एक चौकार आणि ३ षटकारांसह २५ तर, मॅक्सवेलने ९ चेंडूत ३ चौकारांसह १२ धावा केल्या.

LIVE UPDATE :

  • राजस्थानचा पंजाबवर चार गडी राखून विजय
  • टॉम करनचा पहिल्याच चेंडूवर षटकार
  • रियान पराग बाद
  • रियान पराग मैदानात
  • तेवतिया ३१ चेंडूत ५३ धावा करुन बाद
  • तेवतियाचे अर्धशतक
  • जोफ्रा आर्चरचे सलग दोन चेंडूंवर षटकार
  • जोफ्रा आर्चरचा मैदानात
  • उथप्पा बाद
  • तेवतियाचे १८व्या षटकांत पाच षटकांर
  • १८व्या षटकांत तेवतियाचे लागोपाठ चार षटकार
  • रॉबिन उथप्पा मैदानात.
  • सॅमसनच्या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश.
  • संजू सॅमसन ८५ धावांवर माघारी, शमीने केले बाद.
  • राजस्थानला विजयासाठी २४ चेंडूत ६३ धावांची गरज.
  • १४ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १३२ धावा
  • १३ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १२२ धावा
  • संजू सॅमसने वेगवान अर्धशतक.
  • १० षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १०४ धावा.
  • ९ षटकानंतर राजस्थानच्या २ बाद १०० धावा.
  • राजस्थानला दुसरा धक्का, स्मिथ बाद. जीमी निशमने केले बाद.
  • स्मिथचे २६ चेंडूत अर्धशतक, खेळीत ७ चौकार आणि २ षटकार.
  • निकोलस पूरनचे सीमारेषेवर जबरदस्त क्षेत्ररक्षण, सॅमसनचा षटकार रोखला.
  • स्मिथ-सॅमसनकडून राजस्थानला चोख उत्तर.
  • पहिल्या पाच षटकात राजस्थानच्या १ बाद ५५ धावा.
  • सॅमसनकडून पहिल्याच चेंंडूवर षटकार.
  • संजू सॅमसन मैदानात.
  • जोस बटलर ४ धावांवर बाद, कॉटरेलने धाडले माघारी.
  • पहिल्या षटकात राजस्थानच्या बिनबाद ११ धावा.
  • स्टिव्ह स्मिथकडून राजस्थानसाठी पहिला चौकार.
  • शेल्डन कॉटरेल टाकतोय पंजाबसाठी पहिले षटक.
  • राजस्थानची सलामीची जोडी जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ मैदानात.
  • पंजाबचे राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचे आव्हान.
  • २० षटकात पंजाबच्या २ बाद २२३ धावा.
  • शेवटच्या षटकात पंजाबकडून १८ धावा वसूल.
  • १९ षटकानंतर पंजाबच्या २ बाद २०५ धावा.
  • निकोलस पूरन मैदानात.
  • अंकित राजपूतला मिळाली राहुलची विकेट.
  • पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल ६९ धावांवर माघारी. राहुलच्या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • ग्लेन मॅक्सवेल मैदानात.
  • १८३ धावांवर पंजाबने गमावला आपला सलामीवीर फलंदाज.
  • मयांक १०६ धावांवर बाद, टॉम करनला मिळाली विकेट.
  • मयांककडून भारतीय म्हणून आयपीएलमधील दुसरे वेगवान शतक.
  • मयांकचे ४५ चेंडूत शतक, खेळीत ७ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश.
  • १५ षटकानंतर पंजाबच्या बिनबाद १७२ धावा. मयांकचे शतक.
  • १३ षटकानंतर पंजाबच्या बिनबाद १४८ धावा. मयांक शतकाजवळ.
  • ३५ चेंडूत राहुलचे अर्धशतक.
  • १२ व्या षटकात राहुलचा पहिला षटकार.
  • मयांक-राहुल यंदाच्या आयपीएलची सर्वोत्तम सलामी जोडी. पृथ्वी शॉ-धवनच्या ९४ धावांच्या सलामीला टाकले मागे.
  • मयांक ६९ तर, राहुल ३६ धावांवर नाबाद. राहुलच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश.
  • दहा षटकानंतर पंजाबच्या बिनबाद ११० धावा.
  • मयांक अग्रवालचे २६ चेंडूत तुफानी अर्धशतक. खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश.
  • मयांक अग्रवाल अर्धशतकाजवळ.
  • राहुल तेवतियाच्या पहिल्या षटकात पंजाबच्या सलामीवीरांनी लुटल्या १९ धावा.
  • मयांकचे तेवतियाला सलग दोन षटकार.
  • सात षटकानंतर पंजाबचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ३१ धावांवर नाबाद.
  • रियान परागचे सीमारेषेवर जबरदस्त क्षेत्ररक्षण, षटकार रोखला.
  • पाच षटकात पंजाबच्या बिनबाद ५८ धावा.
  • फ्री हिटवर राहुलने ठोकला चौकार.
  • पाचव्या षटकात मयांकचे अंकित राजपूतला सलग दोन चौकार.
  • केएल राहुलचे आर्चरला सलग तीन चौकार. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात १३ धावा.
  • आयपीएल २०२० मधील शंभरावा षटकार. उनाडकटच्या गोलंदाजीवर मयांकचा प्रहार.
  • मयांक अग्रवालची आक्रमक सुरुवात.
  • मयांक अग्रवालकडून सामन्याचा पहिला षटकार.
  • पहिल्या षटकात पंजाबच्या बिनबाद ३ धावा.
  • राजस्थानकडून जयदेव उनाडकट टाकतोय पहिले षटक.
  • पंजाबकडून लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल ही सलामीची जोडी मैदानात.
  • नाणेफेक जिंकून राजस्थान प्रथम करणार गोलंदाजी.

किंग्ज इलेव्हन पंजाबची प्लेईंग XI -

लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, शेल्डन कॉटरेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), मुरुगन अश्विन, सरफराज खान, रवी बिश्नोई.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग XI -

स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाल, रियान पराग, जयदेव उनाडकट, अंकित राजपूत, राहुल तेवतिया.

Last Updated : Sep 28, 2020, 1:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.