नवी दिल्ली - आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत: कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १३ सामन्यात ४७१ धावा आहे. तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्जचा फाफ डु प्लेसिस असून त्याने १३ सामन्यात ४४९ धावा केल्या आहेत.
तर, 'पर्पल' कॅप जसप्रीत बुमराहकडे आहे. बुमराहने १३ सामन्यांमध्ये एकूण २३ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कगिसो रबाडा असून त्यानेही २३ बळी घेतले आहेत.
गुणतालिकेची सद्यस्थिती -
सद्याच्या घडीला प्लेऑफसाठी पात्र ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. बाकीच्या तीन स्थानांसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झुंज सुरू आहे.