दुबई - आयपीएलचा तेरावा हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एक मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो पुढील सामन्यात खेळणार की नाही. याबाबत सशांकता आहे. जर सैनीची दुखापत गंभीर असेल तर बंगळुरूसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
काल रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान, १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर नवदीप सैनीला दुखापत झाली.
कशी झाली दुखापत -
नवदीप सैनी बंगळुरूकडून १८व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाने मारलेला फटका अडवताना सैनीच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे तो मैदानाबाहेर गेला.
यावर बंगळुरूचे फिजिओ इवान स्पिचली यांनी सांगितलं की, सैनीची दुखापत गंभीर आहे की नाही, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण सैनीच्या अंगठ्यावर टाके घालण्यात आले आहेत. तसेच त्याच्या दुखापतीचे मॉनिटरिंग करण्यात येत आहेत. हे सर्व पाहता तो कधी मैदानात परतेल, हे माहिती नाही.
विराटलाही झाली होती अशीच दुखापत -
विराट कोहलीला देखील चार-पाच वर्षांपूर्वी अशीच दुखापत झाली होती. पण, विराटने दुखापत झाली असताना देखील मैदानात उतरत शतक झळकावले होते.
चेन्नईविरूद्धच्या सामन्यात बंगळुरूचा असा झाला पराभव -
चेन्नईचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक आणि अंबाटी रायुडूच्या ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा ८ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या चिवट अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूला २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारता आली. पण सलामीवीर ऋतुराजने मैदानात अखेरपर्यंत तळ ठोकत ख्रिस मॉरिसला षटकार खेचत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया दौऱ्याची लगबग सुरू; पुजारा, विहारीसह कोचिंग स्टाफ यूएईला रवाना होणार
हेही वाचा - ऑर्चरने टिपलेला झेल पाहून गोलंदाज त्यागीसह पराग अचंबित; सचिनची बोलकी प्रतिक्रिया