ETV Bharat / sports

RCB VS MI : हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल - पांड्या मॉरिस मैदानात भिडले न्यूज

मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि आणि ख्रिस मॉरिस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2020, MI vs RCB: Hardik Pandya, Chris Morris Reprimanded For Breaching Code Of Conduct
RCB VS MI : हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Oct 29, 2020, 7:00 PM IST

अबुधाबी - मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि आणि ख्रिस मॉरिस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमके काय घडले -

ख्रिस मॉरिसने १५व्या षटकात हार्दिकला यॉर्कर आणि संथ गतीने चेंडू टाकत हैराण केले. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिकने षटकार ठोकला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली होती. १७व्या षटकात मॉरिस पुन्हा गोलंदाजीसाठी आल्यानंतर दोघांमध्ये टशन पाहायला मिळाले. हाच प्रकार १९व्या षटकात देखील झाला. या षटकातील चौथ्या चेंडूवर पांड्याने मॉरिसच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मॉरिसने मोहम्मद सिराजकरवी पांड्याला झेलबाद केले.

पांड्या भडकला -

ख्रिस मॉरिसने बाद केल्यानंतर पांड्या चांगलाच भडकला. बाद झाल्यावर तो मॉरिसच्या जवळ गेला आणि तो काही तरी पुटपुटला. मॉरिसनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मैदान सोडताना पांड्या मॉरिसला हाताना इशारा करत काही तरी सांगितल्याचे पाहायला मिळाले.

जर हा प्रकार पुन्हा घडला तर...

दरम्यान, पांड्या आणि मॉरिस यांनी आयपीएलच्या नियमाचे उल्लंघन केले. या दोघांकडून पहिल्यांदाच ही चूक झाली, त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. यापुढे जर या दोघांकडून जर कोणतीही चूक घडली तर त्यांच्यावर आयपीएलच्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येऊ शकते. दोघांना सामनाधिकाऱ्यांनी ताकिद दिली.

असा रंगला सामना -

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले.

हेही वाचा - भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर

हेही वाचा - आशा आहे निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी बघितली असावी, दिग्गजाने निवड समितीला फटकारले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.