अबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये शनिवारी झालेल्या सलामीची लढत जिंकत चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरूवात केली. चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या विजयात धडाकेबाज फलंदाज अंबाती रायुडूने स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघव्यवस्थापनानेही 'बाहुबली परत आला' अशा शब्दांत रायुडूचे कौतुक केले.
-
Bahubali Returns! 🦁💛 #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #MIvCSK pic.twitter.com/eoIUK0wFK9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bahubali Returns! 🦁💛 #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #MIvCSK pic.twitter.com/eoIUK0wFK9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020Bahubali Returns! 🦁💛 #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #MIvCSK pic.twitter.com/eoIUK0wFK9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020
मुंबईच्या १६२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर शेन वॉटसन (४) आणि मुरली विजय (१) पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. त्यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. त्यानंतर अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले. फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.
'सुपर' विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघव्यवस्थापनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन रायुडूचा फोटो शेअर केला आहे. त्याला त्यांनी 'बाहुबली परत आला' असे कॅप्शन दिले आहे. या खेळीसोबतच रायुडूने गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या निवड समितीला आणि संघव्यवस्थापनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विश्वकरंडक २०१९ साठी रायुडूला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला होता. चौथ्या क्रमांकावरचा तज्ज्ञ फलंदाज असूनही त्याला संघात न घेतल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण निवड समितीने त्याला संघाबाहेर करत विजय शंकरला संधी दिली होती.