ETV Bharat / sports

IPL २०२० : 'या' खेळाडूला विश्वास.. यंदाची आयपीएल केकेआर जिंकणार - kuldeep ON ipl 2020 winner

आयपीएलच्या १३ हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाइट रायडर्स पटकवणार, असा विश्वास फिरकीपटू कुलदीप यादवने व्यक्त केला आहे.

IPL 2020 : kkr will win this time says kuldeep yadav
IPL २०२० : आयपीएल स्पर्धा केकेआर जिंकणार; 'या' खेळाडूचा विश्वास
author img

By

Published : Sep 1, 2020, 3:10 PM IST

दुबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. चेन्नई वगळता सर्व संघातील खेळाडू सराव सत्रात घाम घाळत आहेत. प्रत्येक संघ विजेतेपद पटकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने यंदाचे विजेतेपद केकेआर पटकावणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप म्हणाला की, आम्ही मागील दोन वर्षांपासून चांगल्या लयीत आहेत. पण आम्हाला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदाच्या वर्षी आम्ही जर चांगला समन्वय राखत विरोधी संघावर आक्रमण केलं तर नक्कीच विजेतेपद पटकावू. यंदा आमचा संघ बाजी मारू शकतो.

सनरायझर्स हैदराबादने २०१८ च्या हंगामात क्वालिफायर राऊंडमध्ये केकेआरचा पराभव केला होता. हा पराभव आमच्या जिव्हारीला लागला असल्याचेही कुलदीप म्हणाला. त्या सामन्यात माझ्या गोलंदाजीच्या स्पेलनंतर राशिद खानने वेगाने धावा जमवल्या आणि आम्हाला पराभवाच्या खायीत ढकलले, असेही कुलदीपने सांगितले.

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघाने आतापर्यंत दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळताना २०१२ आणि २०१४ या दोन वर्षी आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या हंगामात केकेआरच्या संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे आहे. या हंगामात केकेआरची कामगिरी कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यंदा कोरनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरला होईल तर १० नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा - CSK चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'हा' अनुभवी खेळाडू IPL खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.