दुबई - मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्याआधी मुंबईचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नव्या लूकमध्ये पाहायला मिळाला. बुमराह आयपीएलमधील मुंबई संघाचा एक जुना व अनुभवी खेळाडू आहे.
![ipl 2020 jasprit bumrah reveals new look ahead of the qualifier clash mumbai indians vs delhi capitals](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9443011_rrrrrrrrrrr.jpg)
बुमराह संपूर्ण हंगामात संपूर्ण दाढी व मिशीत खेळताना दिसला होता. आता त्याने आपली दाढी अर्धी कापली असून मिशी देखील एकदम हलकीशी ठेवली आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृनाल पांड्याने देखील त्याची तुलना एका फुटबॉलपटू सोबत केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, याआधी हार्दिक पांड्याने देखील आपला लूकमध्ये बदल केला आहे.
जसप्रीत बुमराहची आयपीएल २०२० मधील कामगिरी -
जसप्रीत बुमराहने एकूण 13 सामने या हंगामात खेळले आहेत. यात त्याने सर्वाधिक 23 बळी घेतले आहेत. 'पर्पल कॅप' च्या यादीत तो रबडाच्या 25 विकेट्सनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
मुंबई-दिल्ली यांची कामगिरी -
मुंबईने १४ पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. दुसरीकडे दिल्लीने सलगच्या चार पराभवानंतर बंगळुरुला पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा - IPL २०२० : मुंबई-दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी आज झुंजणार
हेही वाचा - 'थाला' धोनीबद्दल चेन्नईचे मालक श्रीनिवासन यांनी केली महत्वाची घोषणा, म्हणाले...