कानपूर - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यामुळे सर्व खेळाडू कस्सून सराव करत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू तथा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य कुलदीप याच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. यादरम्यान त्याने यंदाचे आयपीएल माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
बातचित दरम्यान कुलदीप म्हणाला, 'माझ्यासाठी आयपीएलचा मागील १२ हंगाम खास ठरला नाही. १२ हंगामात मला जास्त गडी बाद करता आले नाहीत. यंदाचा हंगाम माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. कारण आयपीएलच्या माध्यमातून आयसीसी टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीला मदत होणार आहे. मला आशा आहे की हा हंगाम माझ्यासाठी चांगला ठरेल.'
सचिन आणि वॉर्न माझे आदर्श -
कुलदीपने सांगितलं की, सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न माझे आदर्श आहेत. मी वॉर्नकडे पाहून खूप शिकलो आहे.
धोनीविषयी कुलदीप म्हणाला...
धोनी मला नेहमी मार्गदर्शन करत आला आहे. त्याचा अनुभव माझ्यासाठी कायम उपयोगी ठरला आहे. तो यष्टीमागे उभं राहून मला गोलंदाजीमध्ये मार्गदर्शन करतो. धोनीसोबत विराटही मला प्रोत्साहन देतो. धोनीचा मी चाहता असून मला धोनीची मैदानात कमी जाणवते.
हेही वाचा - माहीची अग्निपरीक्षा..! भारतीय संघात पुनरागमनासाठी धोनीपुढे बीसीसीआयने ठेवली 'ही' अट
हेही वाचा - 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', चोप्राने केली पाक चाहत्याची बोलती बंद