अबुधाबी - इंडियन प्रिमियर लीग(आयपीएल)चा तेरावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आज शेख जाएद स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजरर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. हा सामना हरणार संघ आयपीएलमधून बाहेर होईल, तर विजेता संघ दिली कॅपीटल्ससोबत क्वालीफायर-२ खेळेल.
बंगळुरूला लीगस्टेजमध्ये सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. तर, हैदराबादने निर्णायक लीग सामन्यात मुंबईला १० गडी राखून पराभूत केलेले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. बंगळुरू आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी लीगस्टेजमध्ये दोन सामने झाले आहेत. यात एका सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला तर एका सामन्यात हैदराबादने.
हैदराबादचा संघ आहेत फॉर्ममध्ये -
हैदराबाद संघाचे गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर असे वाटले होते की, गोलंदाजी काहीशी कमकुवत होईल. मात्र, संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि टी. नटराजन यांनी भुवनेश्वरची कमतरता भासू दिली नाही. संघाची गोलंदाजी मजबूत असल्याचा पुरावा मुंबईविरुद्धच्या सामन्यात मिळाला आहे. गोलंदाजांनी मुंबईच्या संघाला 150चा आकडाही पार करू दिला नव्हता.
हैदराबादच्या गोलंदाजांसमोर विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल यांना रोखण्याचे आव्हान आहे. हैदराबादच्या भात्यात फिरकीपटू राशिद खानसारखे अस्त्र आहे. राशिद कोणत्याही फलंदाजाला आपल्या जाळ्यात ओढू शकतो. डेथ ओव्हर्समध्ये संदीप आणि नटारजन दोघांनीही आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
बंगळुरूची गोलंदाजीही आहे मजबूत -
हैदराबादच्या इन-फॉर्म असलेल्या फलंदाजांना रोखण्यासाठी बंगळुरूकडे नवदीप सैनी, इसुरु उडाना आणि मॉरिस सारखे गोलंदाज आहेत. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंची जोडी संघासाठी वरदान ठरत आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये हैदराबादने आपल्या सलामी जोडी मध्ये बदल केला आहे. कर्णधार वॉर्नरसह रिद्धिमान साहा डावाची सुरुवात करण्यासाठी येत आहे. हैदराबादचा हा प्रयोग यशस्वी ठरत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे या जोडीला लवकरात लवकर माघारी पाठवण्यावर बंगळुरूचा भर असेल. सलामीच्या जोडीनंतर संघाचा भार मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग आणि होल्डर यांच्यावर असणार आहे.
यातून होईल संघाची निवड -
सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बॅसिल थम्पी, बिली स्टॉनलेक, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नाबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रीयम गर्ग, जेसन होल्डर, संदीप बवांका, फाबियान ऐलेन, अब्दुल समद, संजय यादव.
रॉयल चॅलेंजरर्स बंगळुरू - विराट कोहली (कर्णधार), एरॉन फिंच, देवदत्त पड्डीकल, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिपी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, उमेश यादव, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, मोईन अली, पवन देशपांडे, गुरकीरत सिंह मान, मोहम्मद सिराज, क्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, शाहबाज अहमद, इसुरु उडाना, अॅडम झाम्पा, केन रिचर्डसन.