अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जला एक मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात आणखी काही सामने खेळू शकणार नाही. याची माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली.
कॅरेबियन लीग स्पर्धेदरम्यान ब्राव्होला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो फायनलमध्ये खेळला नव्हता. त्याला 'फिट' होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही.
दरम्यान, ब्राव्होच्या जागेवर इंग्लंडचा २२ वर्षाय अष्टपैलू सॅम कुरेनला स्थान मिळाले आहे. त्याने मुंबई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ६ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी करीत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डु प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरला. फाफ डु प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.
हेही वाचा - ''रायडू-चावला लो प्रोफाईल क्रिकेटपटू'', मांजरेकर पुन्हा ट्रोल
हेही वाचा - IPL २०२० : आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना