दुबई - मागील काही दिवसांपासून संकटावर संकट झेलणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक चांगली बातमी आहे. अनुभवी फलंदाज डु-प्लेसिस सीएसके संघासोबत जुळण्यासाठी युएईमध्ये पोहोचला आहे. डु-प्लेसिस सोबत वेगवान गोलंदाज लुंगी एनिगिडीही युएईत दाखल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू डु-प्लेसिस, लुंगी एनगिडी आणि कॅगिसो रबाडा आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येत असून याची सुरूवात १९ सप्टेंबर पासून होणार आहे. तर अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाईल.
डु-प्लेसिस आणि एनगिडी हे सीएसकेचे सदस्य आहेत. तर रबाडा दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू आहे. दोन्ही संघाच्या फ्रेंचायझींनी आपल्या अधिकृत्त ट्विटर अकाऊंटवरु हे तीनही खेळाडू युएमध्ये दाखल झाले असल्याचे सांगितले आहे. याचा त्यांनी फोटोही पोस्ट केला आहे.
दरम्यान, सर्वात पहिले या तिनही खेळाडूंना पुढील ६ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. यादरम्यान त्यांची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. यात ते जर निगेटिव्ह आले तर त्यांना सरावासाठी परवानगी मिळेल.
भारतीय खेळाडू आधीच युएईमध्ये दाखल झाले आहेत. चेन्नई वगळता सर्व संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सीएसकेचे १३ जण कोरोनाबाधित आढळले. यात दोन खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीएसकेच्या संघाचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे ते सद्यघडीला सरावापासून वंचित आहेत.
हेही वाचा - 'माध्यमांनी माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला, सीएसके नेहमीच रैनासोबत'
हेही वाचा - IPL २०२० : धोनीनंतर विराटच्या संघाला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूची स्पर्धेतून माघार