मुंबई - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरात अडकलेल्या चाहत्यांचे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघासाठी खेळणाऱ्या वॉर्नरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो, भारताचा रविंद्र जडेजा सेलिब्रेशन करताना जशी बॅट फिरवतो तशी बॅट फिरवताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला शेअर करताना वॉर्नरने, मागील वर्षी सनरायजर्स हैदराबादसाठी केलेल्या एक जाहिरातीची आठवण आहे. तुम्हाला काय वाटते? मी जडेजाची नक्कल करु शकलो, असा सवाल विचारला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान रविंद जडेजा अर्धशतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन करताना राजपूताना स्टाईलमध्ये बॅट तलवारीप्रमाणे हवेत फिरवतो. जडेजाची ही सेलिब्रेशन करण्याची सिग्नेचर स्टाइल आहे. याची नक्कल करण्याचा प्रयत्न वॉर्नरने केला. पण तो परफेक्ट करु शकला नाही. त्याला ग्रीक, रोमन आणि चीनी मुलासारखी तलवारबाजी करण्यात त्याला यश आले.
आयपीएलच्या १३ हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण कोरोनाच्या संसर्गामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सद्य परिस्थिती पाहिली तर ही स्पर्धा होण्याची शक्यता कमी आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यासाठी आशिया चषक ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी बीसीसीआयला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेही वाचा - 'कोरोनाविरुद्धच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा'
हेही वाचा - 'इज्जती'ने निवृत्ती घ्या, असे म्हणणाऱ्या रमीज राजा यांना मलिक म्हणाला...