ETV Bharat / sports

CSK vs SRH : चेन्नईच्या पराभवाची हॅटट्रिक - चेन्नई स्कॉड टुडे

आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्या झुंजार खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईला करता आला नाही.

ipl 2020 csk vs srh match live
CSK vs SRH LIVE
author img

By

Published : Oct 2, 2020, 7:03 PM IST

Updated : Oct 3, 2020, 12:14 AM IST

दुबई - आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबादचे संघ हे सर्वात समतोल संघ म्हणून ओळखले जातात. परंतु दोन्ही संघांना यंदा विजयाचे सातत्य राखण्यात अपयश आले आहे. आज या दोघांमध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना रंगला. आजच्या सामन्यात हैदराबादने ७ धावांनी चेन्नईवर विजय प्राप्त केला आहे. सनरायजर्स हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या. हैदराबादचा युवा खेळाडू प्रियम गर्ग आजचा सामनावीर ठरला.

आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. फाफ डू प्लेसिस १९ चेंडूत २२ धावाच करू शकला तर वॉटसन ६ चेंडूंत १ धाव काढून तंबूत परतला. भुवनेश्वर कुमारने वॉटसनची विकेट घेतली. यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजाच्या जोडीने हैदराबादची पारी काही प्रमाणात सावरली. धोनीच्या ३६ चेंडूंत ४७ तर जडेजाने ३५ चेंडूंत अर्धशतक करत धावांमधील अंतर कमी केले. अखेरीस फलंदाजीसाठी आलेल्या सॅम करनने ५ चेंडूंत १५ धावा ठोकल्या. हैदराबादकडून टी. नटराजनने २ तर भुवनेश्वर आणि अब्दुल समदने प्रत्येकी एक बळी घेतला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्या झुंजार खेळीमुळे सनराजझर्स हैदराबादने २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईकडून पहिले षटक टाकणाऱ्या दीपक चहरने हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा अप्रतिम त्रिफळा उडवत शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेने पाच चौकारांसह झटपट २९ धावा केल्या. वॉर्नरही २८ धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यात चांगली खेळी केलेल्या विल्सम्सनला या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. वॉर्नर आणि विल्यम्सन लागोपाठ बाद झाल्याने हैदराबादची अवस्था ४ बाद ६९ अशी झाली.

यानंतर अभिषेक शर्मा आणि प्रियम गर्ग या खेळाडूंनी संघाची कमान सांभाळली. अठराव्या षटकात जडेजा आणि शार्दुल ठाकुरने अभिषेकचे दोन झेल सोडले. मात्र, या जीवदानाचा अभिषेकला फायदा उठवता आला नाही. अभिषेकने ४ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. तर, प्रियम गर्गने २६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या. शेवटच्या षटकात चेन्नईच्या गोलंदाजांनी मोठी फटकेबाजी करू दिली नाही. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर, शार्दुल ठाकुर आणि पीयूष चावलाला प्रत्येकी एक बळी मिळाला.

LIVE UPDATE :

  • चेन्नईच्या ५ गडी बाद १५७ धावा
  • सॅम करनच्या ५ चेंडूंत १५ धावा
  • चेन्नईला विजयासाठी १८ चेंडूत ६४ धावांची गरज.
  • सतराव्या षटकात जडेजाने सलग तीन चौकार.
  • चेन्नईला विजयासाठी ३० चेंडूत ८६ धावांची गरज.
  • पंधरा षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद ७९ धावा.
  • तेरा षटकानंतर जडेचा-धोनी १६ धावांवर नाबाद.
  • तेरा षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद ६१ धावा.
  • धोनी-जडेजाची जोडी मैदानात.
  • दहा षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद ४४ धावा.
  • अब्दुल समदने केदारला केले बाद.
  • चेन्नई संकटात, केदार जाधव ३ धावांवर बाद.
  • महेंद्रसिंह धोनी मैदानात.
  • फाफ डु प्लेसिस २२ धावांवर धावबाद. प्रियम गर्गचे क्षेत्ररक्षण.
  • केदार जाधव मैदानात.
  • अंबाटी रायुडू ८ धावांवर बाद, नटराजनने घेतला बळी.
  • पाच षटकानंतर चेन्नईच्या १ बाद २६ धावा.
  • अंबाटी रायुडू मैदानात.
  • भुवनेश्वर कुमारला मिळाली वॉटसनची विकेट.
  • चेन्नईला पहिला धक्का, वॉटसन १ धावा करून बाद.
  • चेन्नईला पहिल्या षटकात मिळाली फक्त १ धाव.
  • भुवनेश्वर कुमार टाकतोय हैदराबादसाठी पहिले षटक.
  • चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन मैदानात.
  • चेन्नईच्या डावाला सुरुवात.
  • २० षटकात हैदराबादच्या ५ बाद १६४ धावा.
  • २०व्या षटकात शार्दुल ठाकुरकडून नो बॉल.
  • प्रियम गर्गचे २३ चेंडूत अर्धशतक. खेळीत ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • १८.२ षटकानंतर हैदराबाद दीडशेपार.
  • जम्मू-काश्मीरचा अब्दुल समद मैदानात.
  • अभिषेकच्या खेळीत चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • अभिषेक शर्मा ३१ धावांवर तंबूत. चहरने केले बाद.
  • अठराव्या षटकात जडेजा आणि शार्दुल ठाकुरने सोडला अभिषेकचा झेल.
  • प्रियम गर्गची आक्रमक फटकेबाजी.
  • प्रियमच्या १६ चेंडूत नाबाद ३५ धावा.
  • सतरा षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद १३३ धावा.
  • प्रियम आणि अभिषेकने सांभाळला हैदराबादचा डाव.
  • अभिषेक शर्माच्या ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २३ धावा.
  • पंधरा षटकानंतर हैदराबादच्या ४ बाद १०० धावा.
  • अभिषेक शर्माची आक्रमक सुरुवात.
  • अभिषेक शर्मा मैदानात.
  • अकरा षटकानंतर हैदराबादच्या ४ बाद ६९ धावा.
  • केन विल्यम्सन ९ धावांवर धावबाद. हैदराबादला चौथा धक्का.
  • युवा खेळाडू प्रियम गर्ग मैदानात.
  • वॉर्नरच्या खेळीत ३ चौकारांचा समावेश.
  • सीमारेषेवर फाफ डु प्लेसिसने वॉर्नरचा घेतला सुंदर झेल.
  • अकराव्या षटकात वॉर्नर २८ धावांवर माघारी, पीयूष चावलाने केले बाद.
  • दहा षटकानंतर हैदराबादच्या २ बाद ६३ धावा.
  • स्ट्रॅटेजिक टाईम आऊटपर्यंत वॉर्नरच्या नाबाद २१ धावा. खेळीत दोन चौकार.
  • केन विल्यम्सन मैदानात.
  • शार्दुल ठाकुरने २९ धावांवर मनीषला केले बाद, मनीष पांडेच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश.
  • हैदराबादला दुसरा धक्का, मनीष पांडे माघारी.
  • पाच षटकानंतर हैदराबादच्या १ बाद ३३ धावा.
  • मनीष पांडेची आक्रमक सुरुवात.
  • पहिल्या षटकात हैदराबादच्या १ बाद सहा धावा.
  • मनीष पांडे मैदानात.
  • बेअरस्टो शून्यावर माघारी.
  • दीपर चहरने बेअरस्टोचा उडवला त्रिफळा.
  • दीपक चहर चेन्नईकडून टाकतोय पहिले षटक.
  • हैदराबादचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर मैदानात.
  • नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय.
  • नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग XI -

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, राशिद खान, खलील अहमद , टी. नटराजन, प्रियम गर्ग, अब्दुल समद.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI -

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, दीपक चहर, सॅम करन.

Last Updated : Oct 3, 2020, 12:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.