शारजाह - आयपीएलचा ३४वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकात दिल्लीला १७ षटकांची आवश्यकता असताना अक्षर पटेलने तीन षटकार लगावत हा सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला. या सामन्यात धवनने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
तत्पूर्वी, फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक आणि अंबाटी रायुडू-रवींद्र जडेजाच्या झटपट खेळीमुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद १७९ धावा केल्या. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी स्वीकारत करन-प्लेसिस जोडीला सलामीला पाठवले. दिल्लीचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला शून्यावर बाद केले. करन बाद झाल्यानंतर प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी ८७ धावांची भागिदारी रचली. प्लेसिसने आपला शानदार फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. त्याच्या ५८ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर, वॉटसनने ६ चौकारांसह ३६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अंबाटी रायुडू आणि रवींद्र जडेजाने संघाची धावसंख्या दीडशेपार नेली. रायुडूने २५ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह ४५ तर, जडेजाने १३ चेंडूत ४ षटकारांसह ३३ नाबाद धावा केल्या. दिल्लीकडून एनरिक नॉर्कियाला २ बळी घेता आले.
MATCH UPDATE :
- रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा चेन्नईवर ५ गडी राखून विजय.
- शेवटच्या षटकात दिल्लीला १७ धावांची गरज.
- धवनचे शतक, खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
- कॅरी बाद.
- दिल्लीला १८ चेंडूत ३० धावांची गरज.
- धवनची शतकाकडे वाटचाल.
- अॅलेक्स कॅरी मैदानात.
- स्टॉइनिस २४ धावांवर बाद, शार्दुलला मिळाला बळी.
- दिल्लीला विजयासाठी ३० चेंडूत ५१ धावांची गरज.
- पंधरा षटकानंतर दिल्लीच्या ३ बाद १२९ धावा.
- तेरा षटकानंतर दिल्लीच्या ३ बाद १०९ धावा.
- दिल्लीला विजयासाठी ४८ चेंडूत ८४ धावांची गरज.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- ब्राव्होने केले श्रेयस अय्यरला बाद.
- दिल्लीचा कर्णधार २३ धावांवर माघारी.
- दिल्लीची भागिदारी तोडण्याच चेन्नईला यश.
- दहा षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ७६ धावा.
- धवनचे सलग तिसरे अर्धशतक.
- दिल्लीला विजयासाठी ६६ चेंडूत ११० धावांची गरज.
- नऊ षटकानंतर धवन ४८ तर, श्रेयस १३ धावांवर नाबाद.
- अय्यर-धवनने सावरला दिल्लीचा डाव.
- दिल्लीला विजयासाठी ९० चेंडूत १५१ धावांची गरज.
- पाच षटकानंतर दिल्लीच्या २ बाद २९ धावा.
- श्रेयस अय्यर मैदानात.
- दिल्लीला दुसरा धक्का, रहाणे बाद. चहरचा दुसरा बळी.
- शिखरकडून डावाचा पहिला चौकार.
- दिल्लीच्या पहिल्या षटकात १ बाद शून्य धावा.
- अजिंक्य रहाणे मैदानात.
- पृथ्वी शॉ शून्यावर बाद.
- दीपक चहर टाकतोय पहिले षटक.
- दिल्लीचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात चेन्नईच्या ४ बाद १७९ धावा.
- रायुडू ४५ तर, जडेजा ३३ धावांवर नाबाद.
- १९ षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद १६३ धावा.
- १७ षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद १३४ धावा.
- १७ षटकानंतर रायुडू १८ चेंडूत ३४ धावांवर नाबाद.
- रवींद्र जडेजा मैदानात.
- महेंद्रसिंह धोनी ३ धावांवर माघारी.
- पंधरा षटकानंतर चेन्नईच्या ३ बाद ११२ धावा.
- महेंद्रसिंह धोनी मैदानात.
- चेन्नईला दुसरा धक्का, प्लेसिस ५८ धावांवर बाद.
- चौदाव्या षटकानंतर चेन्नईच्या २ बाद १०५ धावा.
- १३व्या षटकात धवनने सोडला प्लेसिसचा झेल.
- अंबाटी रायुडू मैदानात.
- वॉटसनच्या खेळीत ३६ धावा.
- वॉटसनचा त्रिफळा उध्वस्त, नॉर्कियाला मिळाला बळी.
- ११.३ षटकात वॉटसन ३६ धावांवर नाबाद.
- फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक, खेळीत ५ चौकार आणि २ षटकाराचा समावेश.
- दहा षटकानंतर चेन्नईच्या १ बाद ७१ धावा.
- आठ षटकानंतर प्लेसिस २८ तर, वॉटसन १८ धावांवर नाबाद.
- पहिल्या पाच षटकात चेन्नईच्या १ बाद २९ धावा.
- चेन्नईच्या पहिल्या षटकात १ बाद २ धावा.
- शेन वॉटसन मैदानात.
- सॅम करन शून्यावर बाद. नॉर्कियाने घेतला करनचा झेल.
- तुषार देशपांडे टाकतोय दिल्लीसाठी पहिले षटक.
- चेन्नईची सलामीवीर जोडी प्लेसिस-करन मैदानात.
- नाणेफेक जिंकून चेन्नईची प्रथम फलंदाजी.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
चेन्नईचा संघ -
फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सॅम करन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, कर्ण शर्मा.
दिल्लीचा संघ -
शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, अॅलेक्स कॅरी, मार्कस स्टॉइनिस, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, कगिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन आणि तुषार देशपांडे.