दुबई - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले. मुंबईच्या विजयानंतर राज्य सरकारने क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
मुंबईच्या विजयानंतर राज्य सरकारचे अधिकृत ट्विटर अकाऊंट सीएमओने एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
-
अभिनंदन @mipaltan 👏🏼👏🏼 https://t.co/EPHrSDAPmb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अभिनंदन @mipaltan 👏🏼👏🏼 https://t.co/EPHrSDAPmb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2020अभिनंदन @mipaltan 👏🏼👏🏼 https://t.co/EPHrSDAPmb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2020
अशी कामगिरी करणारा रोहित एकमेव कर्णधार -
रोहितने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे. आयपीएलला सुरूवात झाली तेव्हा मुंबईची कामगिरी फार चांगली नव्हती. पण २०१३च्या विजेतेपदानंतर मात्र या संघाने मागे पाहिले नाही.
असा रंगला सामना -
दुबईच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीचे हे आव्हान मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने ६८ धावांची तडाखेबंद खेळी केली. तर इशान किशनने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले.
हेही वाचा - IPL 2020 : विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल
हेही वाचा - IPL २०२० : नाद नाय करायचा..! मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद