ETV Bharat / sports

टी-२० क्रिकेटमधील 'स्पेशल' खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सहभागी

author img

By

Published : Sep 9, 2020, 4:02 PM IST

लिन कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, या वर्षी कोलकाताने त्याला 'रिलीज' केले. यामुळे मागील वर्षी डिसेंबरच्या लिलावात त्याच्यावर बोली लागली. मुंबई इंडियन्सने लिनला २ कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले आहे.

IPL 2020 chris lynn joins mumbai indians in uae
टी-२० क्रिकेटमधील 'स्पेशल' खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सामील

अबू धाबी - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन मंगळवारी अबुधाबीमध्ये त्याच्या आयपीएल संघात म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. फ्रेंचायझीने ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटिन्सन आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यूएईत दाखल झाले होते.

लिन कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, यावर्षी कोलकाताने त्याला 'रिलीज' केले. यामुळे मागील वर्षी डिसेंबरच्या लिलावात त्याच्यावर बोली लागली. मुंबई इंडियन्सने लिनला २ कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा यावेळी आयपीएल खेळणार नसल्याने त्याच्या जागी पॅटिन्सनला स्थान देण्यात आले आहे. मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाह ही तीन युएई शहरे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत लीगचे आयोजन करतील. गतविजेत्या मुंबईचा आणि लीगचा पहिला सामना १९ नोव्हेंबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.