ETV Bharat / sports

IPL २०२० Final : दिल्लीच्या पहिल्या विजेतेपदाच्या स्वप्नपूर्तीला 'या' पाच खेळाडूंचा अडसर, जाणून घ्या कोण आहेत... - मुंबई वि. दिल्ली अंतिम सामना

आयपीएलचा अंतिम सामना आज दुबईमध्ये खेळला जाणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना खेळला जाणार असून मुंबईचे इशान किशन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि केरॉन पोलार्ड हे दिल्लीसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

IPL 2020 : 5 players to watch out for MI
IPL २०२० Final : दिल्लीच्या पहिल्या विजेतेपदाच्या स्वप्नात 'हे' पाच खेळाडू आडकाठी, जाणून घ्या कोण आहेत...
author img

By

Published : Nov 10, 2020, 5:51 PM IST

दुबई - गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला तडाखेबंद फॉर्म कायम राखला. त्यांनी साखळी फेरीत ९ विजयासह १८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखले. तसेच क्वालिफायर सामन्यात त्यांनी दिल्लीचा एकतर्फी पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. याआधी मुंबईने आयपीएलचे चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाचव्या विजेतेपदासाठी त्यांची दिल्ली कॅपिटल्सशी झुंज आहे. दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली असून ते पहिल्या जेतेपदासाठी उत्सुक आहेत. दिल्लीच्या जेतेपदाच्या वाटेत मुंबईचे 'हे' पाच खेळाडू अडसर ठरू शकतात. जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू आणि त्यांची कामगिरी...

इशान किशन

मुंबईचा फलंदाज इशान किशनने तेराव्या हंगामात सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने १३ सामन्यांत ४८३ धावा केल्या असून तो सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.

IPL 2020 : 5 players to watch out for MI
इशान किसन

जसप्रीत बुमराह

यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने तेराव्या हंगामात विरोधी संघातील खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केली आहे. त्याने १४ सामन्यांत भेदक मारा करत २७ गडी बाद केले आहेत. सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानी आहे.

ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने बुमराहला चांगली साथ दिली आहे. या दोघांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघांला अनेकदा अडचणीत आणले आहे. बोल्टने १४ सामन्यांत २२ गडी बाद केले आहेत.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने १४ सामन्यात ४ अर्धशतक झळकावत ४६१ धावा केल्या आहेत. हा खेळाडू एकहाती सामना फिरवू शकतो.

केरॉन पोलार्ड

पोलार्डने रोहित शर्मा दुखापतग्रस्त असताना मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. याशिवाय त्याने फलंदाजीत १५ सामन्यांत २५९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने ४ गडीही बाद केले आहेत.

हेही वाचा - IPL २०२० Final : 'कमी लेखू नका, आमची सर्वोत्तम कामगिरी शिल्लक', पॉन्टिंग मुंबईला इशारा

हेही वाचा - IPL २०२० MI vs DC Final : दिल्लीची 'दिवाळी' की मुंबई मारणार 'पंच'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.