कराची - पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. इमामच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. यामुळे तो दुसरी कसोटी खेळू शकणार नाही. रविवारी तो न्यूझीलंडहून पाकिस्तानला रवाना होईल, याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, इमामला मागील आठवड्यात क्विन्सटाऊन येथे सराव सत्रादरम्यान, अंगठ्याला दुखापत झाली. त्याची ही दुखापत गंभीर असल्याने त्याला दुसरी कसोटी खेळता येणार नाही. तो पाकिस्तानला परत जाणार असून तिथे तो लाहोरमधील बोर्डाने तयार केलेल्या केंद्रात राहणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान टीम सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळण्यास येणार आहे.
शादाब खानला देखील झालीयं दुखापत
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्याला ६ आठवड्याची विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे शादाब दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा - IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया
हेही वाचा - VIDEO : 'हाता खुजा रे थे क्या'; मोहम्मद सिराजची खास हैद्राबादी ढंगात मुलाखत