बंगळुरू - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्ड्सन भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर पडला आहे. रिचर्ड्सनला साईड इंजरीचा त्रास होत असल्याने टी-२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्याला हा त्रास नेट्समध्ये सराव करताना झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघात रिचर्ड्सनच्या जागी अँड्र्यू टाय याला संध देण्यात आले आहे.
बीग बॅश लीगमध्ये धमाकेदार प्रदर्शनानंतर केन रिचर्ड्सनला भारत दौऱ्यावर संधी देण्यात आली होती. केन हा बीग बॅश लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. मालिकेच्या दरम्यान त्याला दुखापत होणे ऑस्ट्रेलियासाठी घातक ठरू शकते. यापूर्वीच मिचेस स्टार्क आणि जॉश हेजलवुड दुखापतीमुळे या दौऱ्यावर येऊ शकले नाही.