इंदूर - भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या एका जबरा फॅनची भेट घेतली. या फॅनचे नाव पूजा आहे.
भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. सामना संपल्यावर भारतीय खेळाडू पॅव्हेलियनमधून बाहेर पडत होते. त्यावेळी तिथे विराटची एक चाहती बसली होती.
ती चाहती पूजा असून तिला एका दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या आजारामुळे तिची हाडे मोडतात. पण मोडलेली हाडे पुन्हा एकादोन दिवसात पुन्हा आपोआप जोडली जातात. शाळेत जर शिक्षिकेने पुजाला हात पकडून उभे केले. त्यावेळी पुजाची हाडे आपोआप मोडली आणि जोडलीही गेली. त्यामुळे पूजा जास्त करून घराबाहेर पडत नाही. पण ती विराटला पाहण्यासाठी खास होळकर मैदानावर आली होती.
-
Nothing To Say😍
— Manoj Kumar (@_Manojkumarr) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Virat Kohli Caring Towards His Fan😭❤️
U N B E L I E V A B L E🔥#ViratKohli pic.twitter.com/9tKUsdY6kf
">Nothing To Say😍
— Manoj Kumar (@_Manojkumarr) November 17, 2019
Virat Kohli Caring Towards His Fan😭❤️
U N B E L I E V A B L E🔥#ViratKohli pic.twitter.com/9tKUsdY6kfNothing To Say😍
— Manoj Kumar (@_Manojkumarr) November 17, 2019
Virat Kohli Caring Towards His Fan😭❤️
U N B E L I E V A B L E🔥#ViratKohli pic.twitter.com/9tKUsdY6kf
तेव्हा आपल्या खास फॅनला भेटण्यासाठी विराटही पोहोचला. त्याने पूजाची भेट घेत तिची विचारपूस केली. तसेच त्याने यावेळी पूजाने आणलेल्या टोपीवर आपली स्वाक्षरी देखील केली. दरम्यान, याच सामन्यात एक चाहता विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात शिरला होता.
हेही वाचा - VIDEO : 'दो रुपये की पेप्सी, मुश्फीकुर रहिम सेक्सी'
हेही वाचा - बेनला नडला पेन, म्हणाला, 'आपलं पुस्तक विकलं जाण्यासाठी तो हे सगळं करतोय'