हैदराबाद - सोलापूरचे इंदिरा गांधी स्टेडियम हे आतंरराष्ट्रीय सामन्यासाठी योग्य आहे, येथे आंतरराष्ट्रीय सामने होण्यासाठी काही अडचण नाही. भौतिक सुविधांची पुर्तता केल्यास वर्षभरात हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज होईल, असे भारताचा माजी खेळाडू लालसिंग राजपूत यांनी केले. ते सोलापुरात आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
स्मार्टसिटी योजनेंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास केला जाणार आहे. २५ कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. यावेळी रजपूत यांनी शुक्रवारी स्टेडियमची पाहणी केली. हे स्टेडियम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठे आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामना होण्यास काही हरकत नाही. भौतिक सुविधांची पुर्तता केल्यास बीसीसीआयकडे सामन्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मी यापूर्वी या मैदानावर देवधर ट्रॉफी खेळलो आहे. मैदान तयार आहे, पण खेळपट्टी, आऊटफिल्ड, खेळाडूसांठी ड्रेसिंग रूम, माध्यम, पंच या गोष्टी झाल्या की येथे सामना होण्यास काही अडचण नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान आयुक्त तावरे म्हणाले, या मैदानाचा विकास केला जाणार आहे. या मैदानावर हॉलीबॉल, कब्बड्डी, टेनिस, कराटे, स्केटींग यासारख्या स्पर्धा होतात.