ETV Bharat / sports

India Vs Australia : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका २०२०

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

India tour of Australia : scheduled to begin in Brisbane on 3 December
India Vs Australia : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जाहीर केले वेळापत्रक
author img

By

Published : May 27, 2020, 9:07 PM IST

मुंबई - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उभय संघातील पहिला कसोटी सामन्याला ३ डिसेंबरपासून सुरुवात होईल. हा सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला अ‌ॅ‌‌‌‌‌डलेड येथे दुसरा, २६ डिसेंबरला मेलबर्न येथे तिसरा आणि ३ जानेवारी २०२१ मध्ये सिडनी येथे चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नियोजित आहे. पण कोरोनामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. जर विश्वकरंडक झाल्यास भारतीय संघ ऑक्टोबरमध्येच ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होईल.

दरम्यान, भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका भारताने २-१ च्या फरकाने जिंकली. पण, या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. त्यांच्यावर चेंडू छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती.

असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, ३ डिसेंबर
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अ‌ॅ‌‌‌‌‌डलेड, ११ डिसेंबर
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, २६ डिसेंबर
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, ३ जानेवारी २०२१

हेही वाचा - ब्रेट लीने सांगितले जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे नाव, विराटला वगळले

हेही वाचा - श्रीलंकन बोर्डाने पदार्पणात हॅट्ट्रीक घेणाऱ्या गोलंदाजाचे केले निलंबन, जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.