मुंबई - टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे. रोहितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. मुंबई इंडियन्स संघानेही आपल्या लाडक्या कर्णधाराला काहीशा हटक्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने ट्विटच्या माध्यमातून रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित, तुला अजून जास्त चौकार, षटकार, नवनवे विक्रम आणि खूप साऱ्या ट्रॉफी मिळोत, अशा आशयाच्या शुभेच्छा त्यांनी लाडक्या कर्णधाराला दिल्या आहेत.
-
As the clock strikes 1️⃣2️⃣, we wish our Captain - our Leader more boundaries, more sixes, more runs, more records and many more trophies🏆💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Paltan, send out your wishes with #HitmanDay 🎂#HappyBirthdayRohit #OneFamily @ImRo45 pic.twitter.com/Gflye8ZyVq
">As the clock strikes 1️⃣2️⃣, we wish our Captain - our Leader more boundaries, more sixes, more runs, more records and many more trophies🏆💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2020
Paltan, send out your wishes with #HitmanDay 🎂#HappyBirthdayRohit #OneFamily @ImRo45 pic.twitter.com/Gflye8ZyVqAs the clock strikes 1️⃣2️⃣, we wish our Captain - our Leader more boundaries, more sixes, more runs, more records and many more trophies🏆💙
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2020
Paltan, send out your wishes with #HitmanDay 🎂#HappyBirthdayRohit #OneFamily @ImRo45 pic.twitter.com/Gflye8ZyVq
दरम्यान, रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ पैकी ३ विजेतेपदांवर नाव कोरले. आयपीएलच्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजघडीपर्यंत १८८ सामने खेळली आहेत. यात त्याने ३२.६० च्या सरासरीने ४८९८ धावा झोडपल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहितची सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३६ अर्धशतकं आणि १ शतक ठोकले आहे. दरम्यान, २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी सर्वाधिक चार विजेतेपदे मुंबईकडे आहेत.
हेही वाचा - Happy Birthday Rohit : हिटमॅनचे खास विक्रम, ज्याला तोडणं सोप्प नाही...
हेही वाचा - Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'