दुबई - ऑस्ट्रेलियामध्ये २१ फेब्रुवारीपासून होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या जी.एस.लक्ष्मी या मॅच रेफरी असणार आहेत. या स्पर्धेत मॅच रेफरीची भूमिका साकारणाऱया लक्ष्मी या पहिल्या महिला ठरल्या आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी सामना अधिकाऱयांची घोषणा केली. यातील तीन रेफरींमध्ये लक्ष्मी या एकमेव महिला आहेत. या स्पर्धेसाठी १२ पंचही नियुक्त केले गेले आहेत.
-
🚨 BREAKING NEWS 🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India’s GS Lakshmi set to become 1st woman match referee at a global ICC event. pic.twitter.com/UIeUiLZ8Eq
">🚨 BREAKING NEWS 🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 12, 2020
India’s GS Lakshmi set to become 1st woman match referee at a global ICC event. pic.twitter.com/UIeUiLZ8Eq🚨 BREAKING NEWS 🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 12, 2020
India’s GS Lakshmi set to become 1st woman match referee at a global ICC event. pic.twitter.com/UIeUiLZ8Eq
हेही वाचा - क्रिकेट खेळण्यासाठी संगकारा पाकिस्तानात जाणार, संघाचं करणार नेतृत्व
२२ फेब्रुवारी रोजी पर्थच्या वाका स्टेडियमवर रंगणाऱ्या वेस्ट इंडिज आणि थायलंड सामन्यात लक्ष्मी या अधिकृत मॅच रेफरी असतील. आठ संघांच्या या स्पर्धेत लक्ष्मी यांच्या व्यतिरिक्त इतर महिला लॉरेन एगेनबॅग, किम कॉटन, क्लेअर पोलोसॅक, स्यू रेडफरन आणि जॅकलिन विल्यम्स या सामना अधिकारी आहेत.
आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी सामना अधिकारी -
मॅच रेफरी : स्टीव्ह बर्नार्ड, ख्रिस ब्रॉड, जी.एस. लक्ष्मी.
पंच : लॉरेन एगेनबॅग, ग्रेगरी ब्रेथवेट, ख्रिस ब्राउन, किम कॉटन, शॉन जॉर्ज, नितिन मेनन, क्लेयर पोलोसाक, एहसान रजा, स्यू रेडफर्न, लेंगटन रुसेरे, एलेक्स वार्फ आणि जॅकलीन विलियम्स.