मुंबई - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बाप बनला आहे. त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच हिने आज एका मुलाला जन्म दिला. हार्दिकने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचा हात हातात घेत असलेला एक गोंडस फोटो पोस्ट करत चाहत्यांनी ही गोड बातमी सांगितली.
-
We are blessed with our baby boy ❤️🙏🏾 pic.twitter.com/DN6s7aaZVE
— hardik pandya (@hardikpandya7) July 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are blessed with our baby boy ❤️🙏🏾 pic.twitter.com/DN6s7aaZVE
— hardik pandya (@hardikpandya7) July 30, 2020We are blessed with our baby boy ❤️🙏🏾 pic.twitter.com/DN6s7aaZVE
— hardik pandya (@hardikpandya7) July 30, 2020
लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत नताशाच्या गरोदरपणाची माहिती देत काही फोटो देखील शेअर केले होते. त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरातच एक धार्मिक विधी केल्याचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा इतरांप्रमाणे हार्दिकने देखील लॉकडाऊन लग्न उरकले की काय? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.
हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री स्टँकोविचने जानेवारीत महिन्यात साखरपूडा केला होता. त्यानंतर ते दोघे सोबतच राहत होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचे मॅटर्निटी शूटचे फोटो हार्दिकने शेअर केले होते. हार्दिक बाप झाल्याची बातमी समजताच त्याचे क्रिकेटपटू मित्र आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.