मेलबर्न - भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा 4 धावांनी पराभव केला. या सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने महिला टी-20 विश्वकरंडकाच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. या पूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव केला होता.
न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला 133 धावांवरती रोखून कर्णधार सोफी डिवाईनचा हा निर्णय योग्य ठरवला. दुखापत ग्रस्त स्मृती मानधनाला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयश आले तर, कर्णधार हरमनप्रीत कौर अवघ्या एका धावेवर बाद झाली. भारताकडून शेफाली वर्माने 34 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वात जास्त 46 धावा केल्या.
-
INDIA WIN A THRILLER!
— ICC (@ICC) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New Zealand make a fight of it, but Shikha Pandey holds her cool in the final over to take her team to the #T20WorldCup semi-final!#INDvNZ | #T20WorldCup
📝 https://t.co/FOcEv7TSQx pic.twitter.com/5bisscAHxA
">INDIA WIN A THRILLER!
— ICC (@ICC) February 27, 2020
New Zealand make a fight of it, but Shikha Pandey holds her cool in the final over to take her team to the #T20WorldCup semi-final!#INDvNZ | #T20WorldCup
📝 https://t.co/FOcEv7TSQx pic.twitter.com/5bisscAHxAINDIA WIN A THRILLER!
— ICC (@ICC) February 27, 2020
New Zealand make a fight of it, but Shikha Pandey holds her cool in the final over to take her team to the #T20WorldCup semi-final!#INDvNZ | #T20WorldCup
📝 https://t.co/FOcEv7TSQx pic.twitter.com/5bisscAHxA
हेही वाचा - टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाच्या निर्णयाने टेनिस जगतात खळबळ..
विजयासाठी 134 धावांचे आव्हान समोर ठेऊन न्यूझीलंडचा महिला संघ मैदानात उतरला. ठराविक अंतराने बळी मिळवत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाला अडचणीत आणले. अखेरच्या काही षटकांमध्ये अमेलिया केरने एकतर्फी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला मात्र, यात तिला यश आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने वापरलेल्या प्रत्येक गोलंदाजाने बळी मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले.