मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताचे दोन खेळाडू सराव सत्रात दुखापतग्रस्त झाले आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला थ्रोडाऊन सरावादरम्यान दुखापत झाली. तर युवा फलंदाज पृथ्वी शॉ नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना जखमी झाला.
क्रिकेट जर्नलिस्ट मेलिंदा फारेल हिने ट्विटरवरून ही माहिती दिली. पुजाराला दुखापत झाल्यानंतर तो सराव सोडून बाहेर गेला. त्यानंतर तो काही वेळाने पुन्हा सरावाच्या ठिकाणी आला आणि सरावाला सुरूवात केली. यामुळे भारतीय संघाने सुटकेचा निश्वास सोडला. पुजाराच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.
पुजारापाठोपाठ पृथ्वी शॉ देखील जखमी झाला. सरावादरम्यान त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली. पृथ्वीची दुखापत गंभीर होती. त्यामुळे तो काही वेळ मैदानात आराम करताना पाहायला मिळाला. दरम्यान, काही वेळात शॉने देखील पुन्हा सराव सत्रात भाग घेतला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा हे तिघेही वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. तर रोहित शर्माला देखील दुखापत झाली होती. यामुळे तो देखील पहिले दोन कसोटी सामने खेळू शकला नव्हता.
हेही वाचा - WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा
हेही वाचा - श्रीलंका विमानतळावर इंग्लंडच्या खेळाडूंसह त्यांचे सामनही केले सॅनिटाईज, पाहा व्हिडिओ