ETV Bharat / politics

मारकडवाडी गावातील मतदान आंदोलन प्रशासनाच्या दबावामुळे थांबविण्याचा निर्णय-उत्तम जानकर

माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडून जमावबंदी असताना हा निर्णय घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

markadwadi Election updates
मारकडवाडी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 19 hours ago

Updated : 17 hours ago

पंढरपूर (सोलापूर) राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. पंढरपूरच्या मारकडवाडी गावाताली ग्रामस्थांनी थेट ईव्हीएममध्ये त्रुटी आहे, असा दावा करत मतदानाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून जमावबंदी लागू केली असली तरी ग्रामस्थ मतदानावर ठाम आहेत.

Live updates- मतदानाचे साहित्य मतदानकेंद्रावरत आणण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर पोलीस प्रशासन दाखल झालं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जमावबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितलं आहे.

मारकडवाडी गावात मतपत्रिकेवर मतदानाची तयारी (Source- ETV Bharat Reporter)
  • "मत्रपत्रिकेवरील मतदान आंदोलन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मतदान थांबविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. मतदान सुरू झालं की गुन्हा दाखल करण्यात येईल, असा पोलिसांकडून इशारा देण्यात आला. राम सापपुतेंना दुप्पट मते गेली आहे. पोलिसांमुळे गावकरी आलेच नाहीत. घाबरल्यानं प्रशासनानं मतप्रक्रियेला विरोध केला. माळशिरस तालुक्यातील नागरिकांचा मोर्चा काढणार आहे." असा आरोप राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार उत्तम जानकर यांनी केला.
  • ग्रामस्थ पोलिसांच्या दडपणाखाली- आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, "ईव्हीएम आणि मतपत्रिका यांच्या मतदानाची जुळणी करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्यानं ग्रामस्थ मतदान करण्यासाठी घराबाहेर येत नाहीत. मारकडवाडी गावात प्रशासनाला मतदान होऊ द्यायचं नाही. चारशे-पाचशे आलेले ग्रामस्थ परत गेले. ग्रामस्थ हे पोलिसांच्या दडपशाहीखाली आहेत. प्रशासनाशी चर्चा घेऊन निर्णय घेणार आहोत".
markadwadi Election updates
मतदानकेंद्रावर करण्यात आलेली व्यवस्था (Source- ETV Bharat)
  • मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीमशीनवर संशय व्यक्त केला. गावात मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, ही मागणी प्रशासनानं फेटाळत गावात जमावबंदी लागू केली. ग्रामस्थांनी प्रशासनाचा आदेश धुडकावित गावात मतदानपत्रिकेवर मतदान घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
markadwadi Election updates
गावात पोलीस दाखल (Source- ETV Bharat)

ईव्हीएम मशीनवर संशय- विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) उमेदवार उत्तमराव जानकर हे विजयी झाले. मात्र, त्यांना मिळालेले मताधिक्य हे कमी होते. मागील निवडणुकीचा अनुभव पाहता जानकर यांना मार्कडवाडी गावातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा अपेक्षित होता. विधानसभा 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र असताना गावातून भाजपाचे राम सातपुते यांना मताधिक्य मिळालं. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनीदेखील ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला.

मारकडवाडी ग्रामस्थ निवडणुकीवर ठाम-विधानसभा निवडणुकीच्या निकालात मतमोजणी झाल्यानंतर गावांमधून उत्तमराव जानकर यांना कमी मते मिळाल्याचं दिसून आले. त्यामुळे उत्तमराव जानकर यांनी प्रशासनाकडे मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. प्रशासनानं अशी कोणतीही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मारकडवाडी ग्रामस्थ ठाम आहेत. आज निवडणूक प्रक्रिया पार पडताना प्रशासनानं सहकार्य करावे, अशी ग्रामस्थांनी विनंती केली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा-

  1. ईव्हीएमवर खोटे आरोप कराल, तर खबरदार ! निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे; एस चोकलिंगम यांनी दिला इशारा
  2. 'EVM हॅक करून देतो,' असा दावा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल
  3. "ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज

Last Updated : 17 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.