बुलावायो ZIM VS PAK 2ND T20I : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज मंगळवार, 3 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्ताननं एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
Post-match interactions in Bulawayo: Thanking the fans for their support 🤝✍️#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/tQpk6jRkpx
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 1, 2024
पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा विजय : मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 4 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 108 धावांवर गारद झाला. यासह पाकिस्ताननं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या नजरा मालिकेत पुनरागमनाकडे असतील. तर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानला मालिका जिंकायची आहे. परणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. पाकिस्ताननं 19 T20 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं केवळ 2 सामने जिंकले आहेत. यावरुन पाकिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. मात्र, झिम्बाब्वेला मालिकेत बरोबरी साधायची असेल तर पाहुण्या संघाला दुसऱ्या T20 सामन्यात कडवं आव्हान द्यावं लागेल.
Pakistan complete a comprehensive 57-run win over Zimbabwe in the first T20I 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 1, 2024
Bowlers put in a solid display to grab the last 8️⃣ wickets for 3️⃣1️⃣ runs 🎯#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/IJ7ajUB0CU
17 तासांआधीच प्लेइंग 11 घोषित : मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आता पाकिस्तानच्या नजरा हा सामना जिंकत मालिका जिंकण्यावर असतील. या मालिकेसाठी पाकिस्तान संघाचा नियमित कर्णधार मोहम्मद रिझवान आणि वरिष्ठ खेळाडू बाबर आझम यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी सलमान अली आगाकडे आहे. आता पाकिस्ताननं दुसऱ्या T20 साठी 17 तासांआधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
Unchanged team for the second T20I against Zimbabwe tomorrow 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/okgAUvDdg2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 2, 2024
दोन फिरकीपटूंना प्लेइंग 11 मध्ये संधी : पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाजी आक्रमणाची कमान हरिस रौफ आणि मोहम्मद अब्बास आफ्रिदी यांच्याकडे असेल. जहानदाद खानलाही त्यांना साथ देण्यासाठी संघात संधी मिळाली आहे. तर अबरार अहमद आणि सुफियान मुकीम यांना स्पिनर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. अबरार गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे आणि आपल्या खेळानं प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
दुसऱ्या T20 सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग 11 : सलमान अली आगा (कर्णधार), सॅम अयुब, ओमेर बिन युसूफ, उस्मान खान, तय्यब ताहिर, इरफान खान, जहाँदाद खान, मुहम्मद अब्बास आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, सुफियान मुकीम.
हेही वाचा :