चंदीगड : शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी उपमुख्यमंत्री असताना 2007 ते 2017 या कालावधीत धार्मिक गैरवर्तन केल्याचा ठपका अकाल तख्तकडून ठेवण्यात आला आहे. धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना स्वच्छता गृह साफ करण्याची आणि भांडी धुण्याची शिक्षा देण्यात आली आहे. सुखबीर सिंह बादल यांना ऑगस्टमध्ये धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी अकाल तख्तनं दोषी घोषित केलं.
Sukhbir Badal directed to clean bathrooms, wash untensils as punishment for " religious misconduct"
— ANI Digital (@ani_digital) December 2, 2024
read @ANI Story | https://t.co/wk9NFfAxxf#SukhbirBadal #AkalTakht #religiousmisconduct #Punjab pic.twitter.com/7ZO6dEXjLF
धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी सुखबीर सिंह बादल दोषी : सुखबीर सिंह बादल यांनी 2007 ते 2017 या कालावधीत धार्मिक गैरवर्तन केल्याचा ठपका अकाल तख्तनं ठेवला आहे. अकाल तख्चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखालील पाच मुख्य पुजाऱ्यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. या पुजाऱ्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर सिंह बादल यांचा पक्षप्रमुखपदाचा राजीनामा स्वीकारण्यास सांगितलं. अकाल तख्त इथल्या शीख धर्मगुरूंनी 'तनखाह' अर्थात धार्मिक शिक्षा ठोठावताना सांगितलं, की सुखबीर सिंह बादल 3 डिसेंबरला दुपारी 12 ते 1 या वेळेत स्नानगृहं स्वच्छ करतील. त्यांना 12 ते 1 या वेळेत श्री दरबार साहिबच्या स्नानगृहांची सेवा करण्यास सांगण्यात आलं आहे. आज दुपारी आणि नंतर एक तास भांडी धुऊन गुरबानी ऐकावी लागणार आहे. त्यांना गळ्यात फलक घालण्यास सांगण्यात आलं आहे.
सुखबीर सिंग बादल यांनी मान्य केले आरोप : अकाल तख्तच्या शीख धर्मगुरूंनी सुखबीर सिंह बादल यांना शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी धर्मगुरूंनी केलेले आरोप सुखबीर सिंह बादल यांनी मान्य केले आहेत. धर्मगुरू आणखी काही जणांना शिक्षा ठोठावली आहे. यात सुखदेव सिंह धिंडसा, सुचा सिंह लंगाह, हिरा सिंह गाबरिया आणि बलविंदर सिंह भूंदर यांचा समावेश आहे. सुखबीर सिंह बादल यांना दोन दिवस 'सेवादार'चा पोशाख घालून प्रत्येकी एक तास सुवर्ण मंदिराबाहेर सेवा बजावण्यास सांगण्यात आलं. तर गुरुद्वारांमधील लंगरमध्येही एक तास सेवा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकाली नेतृत्वानं नैतिक अधिष्ठान गमावलं असून अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड सहा महिन्यांत व्हायला हवी, असं शीख धर्मगुरूंनी म्हटलं आहे. सुखबीर सिंह बादल यांनी या वर्षी नोव्हेंबरमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बंडखोर गटानं अकाली दलाला बळकटी देण्याचा प्रयत्न करावा, असंही यावेळी धर्मगुरूंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :