हैदराबाद - ऑस्ट्रेलियाला मायदेशात धूळ चारल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. उद्या (शुक्रवार ता. २४ ) पासून उभय संघात टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, या मालिकेआधी भारतीय संघाची न्यूझीलंडमधील कामगिरी पाहिल्यास, न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरल्याचे दिसते. आश्चर्याची बाब म्हणजे, ७९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा विराटने न्यूझीलंडमध्ये एकही सामना खेळलेला नाही. वाचा आतापर्यंत न्यूझीलंड-भारत संघातील टी-२० सामन्याचा रेकॉर्ड -
- टी-२० मालिकेचा विचार केल्यास, आजघडीपर्यंत भारत-न्यूझीलंड संघात एकूण ४ मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यात न्यूझीलंडने ३ तर भारताने एक मालिका जिंकली आहे. दरम्यान, भारताला न्यूझीलंडमध्ये अद्याप एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही.
- टी-२० क्रिकेटमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १२ सामने झालेल आहेत. त्यापैकी ८ सामने न्यूझीलंडने तर भारताने फक्त ३ सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघातील एक मॅच रद्द झाली होती. भारताने ३ पैकी दोन सामने मायदेशात जिंकली आहे.
- न्यूझीलंडमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात आजघडीपर्यंत ५ सामने झाले आहेत. यात न्यूझीलंडने ४ तर भारताला एक सामना जिंकता आला आहे. २०१९ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळतान भारताने ऑकलंडमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.
- भारताकडून टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सर्वाधिक २२१ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांचा विचार केल्यास इरफान पठाण आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ५ विकेट घेतल्या आहेत.
असा आहे भारतीय टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार ), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
भारत- न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
- पहिली टी-२० : ऑकलंड - २४ जानेवारी २०२०
- दुसरी टी-२० : ऑकलंड - २६ जानेवारी २०२०
- तिसरी टी-२० : हॅमिल्टन - २९ जानेवारी २०२०
- चौथी टी-२० : वेलिंग्टन - ३१ जानेवारी २०२०
- पाचवी टी-२० : माऊंट माउंगानुई - ०२ फेब्रुवारी २०२०
हेही वाचा - शुभमनला KKR चा कर्णधार कधी बनवलं जाईल, शाहरूखने दिलं मजेदार उत्तर
हेही वाचा - BCCI ची Asia XI vs World XI सामन्याच्या यजमानपदावरुन माघार, वाचा कारण