मुंबई - बीसीसीआयच्या अखिल भारतीय महिला निवड समितीने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. यात एकदिवसीय संघाचे नेतृत्व मिताली राजकडे तर टी-२० संघाची कमान हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपविण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघातील या मालिकांचे आयोजन लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये करण्यात आले आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
-
NEWS: India Women’s squad for ODI and T20I series against South Africa announced. @Paytm #INDWvSAW #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👉 https://t.co/QMmm96qcOt pic.twitter.com/tKjvevd6qH
">NEWS: India Women’s squad for ODI and T20I series against South Africa announced. @Paytm #INDWvSAW #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2021
Details 👉 https://t.co/QMmm96qcOt pic.twitter.com/tKjvevd6qHNEWS: India Women’s squad for ODI and T20I series against South Africa announced. @Paytm #INDWvSAW #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2021
Details 👉 https://t.co/QMmm96qcOt pic.twitter.com/tKjvevd6qH
असा आहे भारतीय महिलांचा एकदिवसीय संघ -
मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधाना, जेमिमाह रोड्रिग्ज, पूनम राउत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डी. हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक) , श्वेता वर्मा (यष्टीरक्षक), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रथ्युषा आणि मोनिका पटेल.
असा आहे भारतीय महिलांचा टी-२० संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), नुजहत परवीन (यष्टीरक्षक) आयुषी सोनी, अरुंधति रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रथ्युषा आणि सिमरन दिल बहादुर.
हेही वाचा - IND vs ENG : मोटेराच्या खेळपट्टीवरुन इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंमध्ये दुमत
हेही वाचा - IND vs ENG: बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार, जाणून घ्या कारण