हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन महिन्यांनंतर मैदानी प्रशिक्षण सुरू केले आहे. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाला भारताची 'वेगवान गोलंदाजांची बॅटरी' म्हणून ओळखले जाते.
शमीने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसून येत आहे. ''फार्महाऊसमध्ये माझ्या सर्व भावांबरोबर सराव केला'', असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीने गोलंदाजी केली होती. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये शमीचे स्थान खूप महत्त्वाचे आहे.
-
Quality practice session 🏏at my farmhouse 🏡all brothers together pic.twitter.com/UZiG0HEf0y
— Mohammad Shami (@MdShami11) July 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Quality practice session 🏏at my farmhouse 🏡all brothers together pic.twitter.com/UZiG0HEf0y
— Mohammad Shami (@MdShami11) July 2, 2020Quality practice session 🏏at my farmhouse 🏡all brothers together pic.twitter.com/UZiG0HEf0y
— Mohammad Shami (@MdShami11) July 2, 2020
2018 मध्ये दुखापतीनंतर शमीने शानदार पुनरागमन केले. 2018-19 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात पराभूत केले. या मालिकेत शमीने जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्यानंतर, 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली होती.
आयसीसीच्या लाळबंदी निर्णयानंतर शमीने आपले मत दिले होते. "लाळ वापरण्याची आमची सवय आहे. मेण किंवा व्हॅसलीन वापरणे फार कठीण जाईल. बाकीच्या गोष्टी कशा कार्य करतात ते आम्हाला पाहावे लागेल. याची सवय होण्यासाठी आम्हाला किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. अन्यथा गोलंदाजांना नक्कीच त्रास होईल'', असे शमी म्हणाला होता.
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट उपक्रम बंद आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवत आहेत.