नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने प्रशिक्षण सुरू केले आहे. कोरोनाव्हायरसमुळे मोठी विश्रांती घेतल्यानंतर इशांतने सरावाला सुरूवात केली. इशांतने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली.
इशांत म्हणाला, "मी स्वत: ला सकारात्मकतेमध्ये व्यस्त ठेवले आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सराव केला." व्हिडिओमध्ये इशांत काही फिटनेस ड्रिल करताना दिसत आहे. इशांतपूर्वी भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही सराव सुरू केला होता. इशांत आणि पुजारा हे दोघेही भारताच्या कसोटी संघाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. लॉकडाऊनमध्ये आता सरकारने थोडी सवलत दिल्याने खेळाडू सराव करण्यास परतले आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. येथे उभय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 90 लाख 38 हजार 807 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.