सिडनी - वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रितसर तक्रार दिली आहे.
अधिकाऱ्यांची चर्चा
आयसीसी आणि स्टेडियम सुरक्षा अधिकारी यांनी जसप्रीत, सिराज आणि भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. अजिंक्य रहाणेही या चर्चेत सहभागी झाला होता.
पंचांकडे धाव
क्षेत्ररक्षण करत असताना खेळाच्या तिसऱ्या सत्रात सिराज तसेच जसप्रीतला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. अजिंक्य रहाणेला हा प्रकार समजल्यानंतर त्याने पंचांकडे धाव घेतली.
आधीही घडले होते प्रकार
२००८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना भारतीय संघास वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. हरभजन सिंग आपल्याला माकड म्हटल्याचा आरोप अँड्र्यू सायमंड्सने केला होता. या आरोपांचे टिम इंडियाने खंडन केले होते.