ETV Bharat / sports

रोहितबद्दल एका शब्दात सांगायचे झाल्यास काय सांगशील, अख्तर म्हणाला...

author img

By

Published : Jan 4, 2021, 4:36 PM IST

शोएब अख्तरला एका चाहत्याने रोहितविषयी एका शब्दात सांगायचे झाल्यास तु काय सांगशील? असा प्रश्न केला. यावर अख्तरने, मार्केटमध्ये तसा शब्द आला की मी याचे उत्तर देईन, असे सांगितले.

indian fan asks shoaib akhtar to describe rohit sharma in one word ex pakistan pacer responds
रोहितबद्दल एका शब्दात सांगायचे झाल्यास काय सांगशील, अख्तर म्हणाला...

मुंबई - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याला एका चाहत्याने रोहितविषयी एका शब्दात सांगायचे झाल्यास तु काय सांगशील? असा प्रश्न केला. यावर अख्तरने, मार्केटमध्ये तसा शब्द आला की मी याचे उत्तर देईन, असे सांगितले.

अख्तरने चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन केले होते. यात चाहते त्याला विविध क्रिकेटपटूविषयी त्याचे मत विचारत होते. एका चाहत्याने त्याला, रोहितविषयी तु एका शब्दात काय सांगशील? असा प्रश्न केला. यावर अख्तरने, मार्केटमध्ये तसा शब्द अद्याप आलेला नाही. तसा शब्द आला की मी तुला ते सांगेन, असे उत्तर दिले.

रोहितशिवाय एका चाहत्याने विराट कोहली आणि बाबर आझमविषयी विचारले. तेव्हा बाबरला अख्तरने सर्व क्रिकेटमधील बेस्ट खेळाडू असल्याचे सांगितलं. एकाने धोनीविषयी विचारले असता, अख्तरने तो 'एक काळ' आहे, असे उत्तर दिले.

अख्तरला राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोघांमधून तुला कोणाला एकाला निवडण्यास सांगितल्यास तु कोणाला निवडणार? असे एकाने विचारले. यात अख्तरने राहुल द्रविडला पसंती दिली. विराट कोहली, बाबर आझम, डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क हे माझे वर्तमान काळामधील फेव्हरेट क्रिकेटर असल्याचे अख्तरने सांगितले.

हेही वाचा - NZ vs PAK 2nd Test : न्यूझीलंड मजबूत स्थितीत, विल्यमसनचे सलग दुसरे शतक

हेही वाचा - टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.