ETV Bharat / sports

अभिनेत्री अनुपमानं घेतली जसप्रीत बुमराहची 'विकेट'; अफेअरच्या रंगल्या चर्चा - dating

भारताचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचं 'प्रीत' दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमसोबत जुळल्याची चर्चा आहे.

अभिनेत्री अनुपमानं घेतली जसप्रीत बुमराहची 'विकेट'; अफेअरच्या रंगल्या चर्चा
author img

By

Published : Jun 15, 2019, 10:05 PM IST

मुंबई - भारताचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचं 'प्रेम' दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरमसोबत जुळल्याची चर्चा आहे. या चर्चा जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्यापासून सुरू झाल्या आहेत. मात्र, या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं अनुपमाने एका मुलाखतीत सांगितले आहे.

जसप्रीत बुमराह आजघडीला क्रिकेटविश्वातील अग्रगण्य गोलंदाज आहे. सद्यस्थितीत बुमराह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. या लोकप्रिय खेळाडूसाठी स्टेडियमध्ये महिला फॅन्सकडून 'माझ्याशी लग्न कर' असे फलक झळकावत लग्नाची मागणी घालण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, जयप्रीतची 'प्रीत' ही अभिनेत्री अनुपमाबरोबर जुळल्याचं बोललं जात आहे. अनुपमा ही 'प्रेमम' या मल्ल्याळम चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे. बुमराह सद्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये खेळत आहे. मैदानात भल्याभल्या फलंदाजाची भंबेरी उडवणाऱ्या बुमराहची विकेट अनुपमाने घेतल्याची चर्चा आहे.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.