लीड्स - आयसीसी विश्वकंरडक स्पर्धेमध्ये भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेविरुध्द होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सोडून लीड्स शहराची भटकंती केली. हार्दिक पांड्याने आपल्या इंन्स्टाग्रान अकाऊंटवर फोटो पोस्ट केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्या, मयंक अगरवाल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि 'कुल' धोनी आपल्या 'कुल' अंदाजात दिसत आहे.
भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यामुळे साखळी फेरीतील अंतिम सामन्याला म्हणावे तितके महत्त्व राहिलेले नाही. मात्र, भारत हा सामना जिंकून गुणातालिकेत अग्रस्थानी पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. या सामन्यापूर्वी खेळाडूंनी सराव सोडून शहराची भटकंती केली.
हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोत भारतीय खेळाडू लीड्सच्या रस्त्यावर धम्माल करताना दिसत आहे. कुलमॅन धोनीने जॅकेट परिधान केला आहे. तर त्यांच्यासोबत पांड्या, अगरवाल, पंत आणि बुमराह स्माईल करत फोटोला पोज देताना दिसत आहेत.