ETV Bharat / sports

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : सामने रटाळ, अनिर्णित पहायला मिळणार नाहीत - विराट कोहली

author img

By

Published : Aug 21, 2019, 8:11 AM IST

विराट कोहली म्हणाला की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मी  उत्सुक आहे. या स्पर्धेमुळे प्रत्येक कसोटी सामन्याचे महत्त्व वाढणार आहे. आता सर्व संघ कसोटी सामने जिद्दीने खेळतील आणि त्यामुळे सामने रंगतदार होतील. काही काळांपासून कसोटी क्रिकेट नष्ट होत चालले आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, माझ्या मते मागील दोन वर्षांमध्ये सर्व कसोटी संघांनी त्यांचा खेळ उंचावला आहे.'

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा: सामने रटाळ, अनिर्णित पहायला मिळणार नाहीत - विराट कोहली

जमैका - भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे. यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरेल. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने वार्तालाप केला.

विराट कोहली म्हणाला की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मी उत्सुक आहे. या स्पर्धेमुळे प्रत्येक कसोटी सामन्याचे महत्त्व वाढणार आहे. आता सर्व संघ कसोटी सामने जिद्दीने खेळतील आणि त्यामुळे सामने रंगतदार होतील. काही काळांपासून कसोटी क्रिकेट नष्ट होत चालले आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र, माझ्या मते मागील दोन वर्षांमध्ये सर्व कसोटी संघांनी त्यांचा खेळ उंचावला आहे.'

पुढे बोलताना विराट म्हणला, 'जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून २०२१ मध्ये इंग्लंड येथे होणार आहे. या अंतिम सामन्यात खेळण्याचे सर्वच संघांचे लक्ष्य असून यासाठी सर्वच संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्न करतील. यामुळे या स्पर्धेत रटाळ, अनिर्णित सामने पहायला मिळणार नाहीत. प्रत्येक संघ गुण मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल'.

काय आहे जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा -
कसोटी क्रिकेटला प्रेक्षक वर्ग कमी होत असल्याने, तसेच कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता मिळावी, यासाठी आयसीसीने ही स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा दोन वर्षा चालणार असून या स्पर्धेत एकूण ७१ सामने होणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना वेस्ट इंडिज विरुध्द होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.