लखनऊ - दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिका संघाची नियमित कर्णधार डेन वान निएर्केकला दुखापत झाली असून यामुळे ती या दौऱ्याला मुकली आहे. डेन मालिकेतून बाहेर पडल्याने, सूने लूस हिच्याकडे आफ्रिका संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला क्रिकेट संघात पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील मालिकेला सात मार्चपासून सुरूवात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी लखनऊमध्ये दाखल झाला आहे. ते पुढील सहा दिवस क्वारंटाइन राहतील.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ -
सूने लूस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनम इस्माइल, लाउरा वोलवार्डट, त्रिशा चेट्टी (यष्टीरक्षक), सिनालो जाफता (यष्टीरक्षक), तस्मीन ब्रिट्ज (यष्टीरक्षक), मरिजाने काप, नोंदूमिसो शंगासे, लिजेले ली (यष्टीरक्षक), अनेके बोश, फाये तुनिक्लीफ (यष्टीरक्षक), नोनकुलुलेको मलाबा, मिगनोन डू प्रीज (यष्टीरक्षक), नादिने डी क्र्लेक, लारा गुडआल आणि तुमी सेखुखुने.
हेही वाचा - भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका महाराष्ट्रात होणार; ठाकरे सरकारचा हिरवा कंदिल