मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाला खास गिफ्ट दिलं आहे. शाह यांनी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरोधात कसोटी सामना खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
भारतीय महिला संघाने अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१४ साली खेळला होता. हा सामना म्हैसूर येथे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरोधात झाला. यात भारतीय संघाने बाजी मारली. भारतीय संघाने हा सामना एक डाव ३४ धावांनी जिंकला होता. यानंतर महिला संघाने कसोटी सामना खेळलेला नव्हता. आता तब्बल ६ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळणार आहे. याची घोषणा जय शाह यांनी केली आहे.
ऑगस्ट २०१५ नंतर महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त सहा कसोटी सामने झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात झाले आहेत. पण आता भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळेल, अशी घोषणा जय शाह यांनी केली आहे.
जय शाह यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला ही घोषणा करण्यास आनंद होत आहे की, भारतीय महिला संघ या वर्षाच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळेल. यानिमित्तानं महिला संघ पुन्हा एकदा पांढऱ्या जर्सीत पाहायला मिळेल, असे शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
On the occasion of #InternationalWomensDay, I’m pleased to announce that #TeamIndia @BCCIWomen will play a one-off Test match against @ECB_cricket later this year. The women in blue will be donning the whites again 🙏🏻 🇮🇳
— Jay Shah (@JayShah) March 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On the occasion of #InternationalWomensDay, I’m pleased to announce that #TeamIndia @BCCIWomen will play a one-off Test match against @ECB_cricket later this year. The women in blue will be donning the whites again 🙏🏻 🇮🇳
— Jay Shah (@JayShah) March 8, 2021On the occasion of #InternationalWomensDay, I’m pleased to announce that #TeamIndia @BCCIWomen will play a one-off Test match against @ECB_cricket later this year. The women in blue will be donning the whites again 🙏🏻 🇮🇳
— Jay Shah (@JayShah) March 8, 2021
दरम्यान, जय शाह यांनी भारत-इंग्लंड महिला संघातील कसोटी सामन्याच्या ठिकाणाची घोषणा केलेली नाही. पण उभय संघातील सामना जून किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'विराट, रोहित आहेत परंतु पंत सारखा खेळाडू मी अजूनपर्यंत पहिला नाही'
हेही वाचा - Mumbai Indians Schedule: IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचे सामने कधी, कोठे आणि कोणाविरुद्ध होणार