पोर्ट ऑफ स्पेन - कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने वेस्टइंडिजवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. आणि यासोबतच एकदिवसीय मालिकाही आपल्या खिशात घातली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्टइंडिजने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये प्रथम फलदांजी करताना वेस्टइंडीजने 240 धावा काढल्या. त्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार 255 धावांचे आव्हान देण्यात आले. सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे खेळ 35 ओव्हरचा करण्यात आला होता. त्यामध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 114 तर श्रेयस अय्यरने 65 धावांची खेळी केली.
वेस्टइंडीजतर्फे सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. विजयानंतर कर्णधार विराट कोहलीला मालिकावीर तसेच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर यासोबतच भारताने ही ३ वन-डे सामन्यांची मालिका २-० च्या फरकाने जिंकली आहे.