अबुधाबी - बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकांच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने आम्ही केरॉन पोलार्डच्या नेतृत्वात भारताला त्यांच्याच मैदानातर धुळ चारू, असे म्हटले आहे. रसेल सद्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी-१० स्पर्धेत नॉर्दन वॉरियर्स संघाकडून खेळत आहे.
बांगलादेश विरुध्दच्या अखेरच्या कसोटीनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुध्द ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी आंद्रे रसेलने सांगितले की, 'भारतीय संघाला त्यांच्या देशात हरवणे तितके सोपे नाही. पण आम्हाला भारतामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर आमचा संघही चांगला बांधला गेला आहे. यामुळे आम्ही त्यांचा भारतामध्ये पराभव करू शकतो.'
यावेळी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची स्तुतीदेखील केली. तो विराट विषयी म्हणाला, 'विराट असाधारण खेळाडू असून तो क्रिकेटच्या तिनही प्रकारात आदर्श आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.'
केरॉन पोलार्ड एकदिवसीय आणि टी-२० मध्ये विडींज संघाचे चांगले नेतृत्व करेल, अशी आशाही रसेलने बोलून दाखवली. दरम्यान, उभय संघातील टी-२० मालिकेला ६ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - ACC Emerging Cup Semi-Final : चुरसीच्या सामन्यात पाकिस्तानची भारतावर मात
हेही वाचा - गुलाबी चेंडूवर खेळण्यात आलेले आजपर्यंतचे सामने, कोणता संघ ठरला सरस; वाचा एका क्लिकवर...