बंगलुरू - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे. विराट अफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माला मागे टाकत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला होता. त्यानंतर रोहित शर्माने आज रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर विराटला मागे टाकत या यादीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले होते.
मात्र, तो या सामन्यात ९ धावा करु शकला. तेव्हा विराटने याच सामन्यात रोहितला मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले.
हेही वाचा - कमाईत इंग्लंडचा जोफ्रा आर्चरने विराटला टाकले मागे, मिळवले इतके कोटी
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे एक व दोन नंबरवर आहेत. दोघांमध्ये सद्य स्थितीला जास्त अंतर नाही. मात्र, दोघांमध्ये शर्यत रंगली असून यात कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण आहे. रोहित शर्मानंतर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टीलचा नंबर लागतो.
विराट कोहली २४५० धावा काढून अव्वलस्थानी आहे. तर त्याखालोखाल रोहित शर्माने २४४३ धावा काढल्या आहेत. तिसऱ्या स्थानी मार्टिन गुप्टील असून त्याने २२८३ धावा केल्या आहेत. यानंतर पाकचा शोएब मलिकने २२६३ आणि ब्रॅडन मॅक्युलम याने २१४० धावा केल्या आहेत.
हेही वाचा - द्रविड बाबतीत झालेल्या चूकीवर नेटीझन्स आयसीसीला म्हणाले, तुम्ही नशेत आहात का?