मँचेस्टर - भारत विरुध्द न्यूझीलंडच्या सामन्यात पहिल्या 20 षटकात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावांसाठी वेसन घातले आहे. असे असताना, 16 षटकात गोलदांजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे स्नायू दुखावले गेले. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते मात्र पांड्याची दुखापत गंभीर नसल्याने तो पुन्हा मैदानात आला आहे.
हार्दिक पांड्या 16 षटकात गोलंदाजी करत होता. तेव्हा त्याच्या पायाचे स्नायू ताणले गेले यामुळे पांड्याला मैदान सोडावे लागले. तो 16 व्या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. आता त्याची ही दुखापत गंभीर नसल्याने तो पुन्हा मैदानात आला आहे. पांड्या मैदानात परतल्याने भारतीय संघासाठी ही बाब सुखद ठरणार आहे.