नॉटिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झाली नसून एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्याची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे.
-
Unfortunately, India's #CWC19 game against New Zealand has been called off due to the rain 😭.
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The points have been shared.#TeamIndia | #BackTheBlackcaps pic.twitter.com/Sr4qlzDriJ
">Unfortunately, India's #CWC19 game against New Zealand has been called off due to the rain 😭.
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 13, 2019
The points have been shared.#TeamIndia | #BackTheBlackcaps pic.twitter.com/Sr4qlzDriJUnfortunately, India's #CWC19 game against New Zealand has been called off due to the rain 😭.
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 13, 2019
The points have been shared.#TeamIndia | #BackTheBlackcaps pic.twitter.com/Sr4qlzDriJ
सामना रद्द झाल्याने भारत-न्यूझीलंड या संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. गुणतालिकेचा विचार केला असता न्यूझीलंड संघाने ७ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर भारतीय संघ ५ गुण मिळवून तिसऱ्या स्थानी आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत.